Sameer Amunekar
जर त्या दिवशी चांगला पाऊस पडणार असेल, तर झाडांना वेगळं पाणी देण्याची गरज नाही. हवामानाचा अंदाज तपासूनच निर्णय घ्या.
झाडाच्या भोवतीची माती बोटाने थोडी खणून पाहा. जर माती ओलसर असेल, तर पाणी देऊ नका. कोरडी वाटल्यासच पाणी द्या.
कुंडीत किंवा बागेतील जमिनीत पाणी साचणार नाही याची काळजी घ्या. मुळं सडू नयेत म्हणून चांगला निचरा आवश्यक आहे.
काही फुलझाडांना सतत ओलावा आवडत नाही. अशा झाडांना आवश्यकतेनुसारच पाणी द्या आणि मुळांभोवती गच्च पाणी साचू देऊ नका.
जर पाणी द्यावंच लागलं, तर सकाळी लवकर किंवा सूर्य मावळल्यावर द्या. त्यामुळे झाडं उष्णतेपासून वाचतात.
नवीन लावलेली रोपे अधिक संवेदनशील असतात. त्यांना थोडं थोडं पाणी द्या. मोठ्या झाडांना कमी पाणी लागते, विशेषतः पावसात.