Sameer Amunekar
चेंगराचेंगरीच्या प्रसंगी स्वतःचा जीव कसा सुरक्षित ठेवायचा?" यावर आधारित 5 महत्त्वाच्या टिप्स या वेबस्टोरीमध्ये दिलेल्या आहेत.
घाबरून धावपळ केल्यास तुम्ही अधिक अडकल्याची शक्यता असते. शक्य तितकं शांत राहून स्वतःचं संतुलन राखा.
गर्दी ज्या दिशेने जाते, त्याच दिशेने हळूहळू पुढे सरका. उलट दिशेने जाण्याचा प्रयत्न केल्यास तुम्हाला चेंगरलं जाऊ शकतं.
मोबाईल, चप्पल किंवा इतर वस्तू खाली पडल्या तरी झुकू नका. अशावेळी वाकल्यास लोकांच्या पायाखाली चेंगरले जाण्याचा धोका असतो.
भिंतींना किंवा कठड्यांना चिकटून राहिल्यास चेंगराचेंगरीत अडकण्याची शक्यता अधिक असते. शक्य असल्यास मोकळ्या जागेकडे सरका.
दोन्ही हात कोपर्यात वाकवून छातीसमोर ठेवा. यामुळे छाती व श्वसनमार्गाचं संरक्षण होईल आणि श्वास घेता येईल.