Akshata Chhatre
विराट कोहली हा आजच्या काळातील सर्वात फिट क्रिकेटपटूंमध्ये गणला जातो. त्याची ही ऊर्जा आणि स्टॅमिना यामागे आहेत काही खास सवयी!
कोहली प्रक्रिया केलेले पदार्थ, साखर, डेअरी व ग्लूटन टाळतो. चांगल्या फॅट्स, फळं आणि भाज्यांचा भरपूर समावेश करतो.
कोहली रोज वर्कआउट करतो कार्डिओ, वेट ट्रेनिंग, कोअर एक्सरसाइज यावर भर देतो. यामुळे तो फील्डवर अॅक्टिव्ह आणि अॅथलेटिक राहतो.
कोहली नियमित ध्यान करतो. यामुळे त्याला एकाग्रता, तणावमुक्ती आणि मानसिक संतुलन मिळतं.
2018 पासून कोहलीने अल्कोहोल आणि अनहेल्दी खाणं पूर्णपणे टाळलं. त्याने स्वतःचा जीवनशैलीत पूर्ण बदल केला.