गोव्यात '। Love You' कसं म्हणतात? कोकणीतील हे प्रेमळ शब्द ऐकून तुमचंही मन प्रसन्न होईल!

Manish Jadhav

सांस्कृतिक विविधतेचा वारसा

भारतातील प्रत्येक राज्य आपल्या वेगळ्या संस्कृतीसाठी आणि भाषेसाठी ओळखलं जातं. या भाषिक विविधतेच्या बाबतीत आपला देश जगातील इतर देशांच्या तुलनेत अत्यंत समृद्ध आहे.

Relationship | Dainik Gomantak

गोव्याची अधिकृत भाषा

पण तुम्हाला माहितीये का? गोव्याच्या सौंदर्याइतकीच तिथली भाषाही सुंदर आहे. गोव्यात प्रामुख्याने 'कोकणी' भाषेत संवाद साधला जातो, जी ऐकायला खूप गोड वाटते.

Relationship | Dainik Gomantak

प्रेमाची कोकणी भाषा

गोव्यातील लोक केवळ संवादच नाही, तर आपल्या मनातील प्रेमाची कबुली देण्यासाठीही कोकणी भाषेचाच वापर करतात. कोकणीत व्यक्त केलेलं प्रेम खूपच रोमँटिक वाटतं.

Relationship | Dainik Gomantak

गोव्यात 'I Love You' ला काय म्हणतात?

अनेकांना प्रश्न पडतो की गोव्यातील जोडपी प्रेमाची कबुली कशी देतात? तर कोकणी भाषेत 'I Love You' ला "हांव तुजेर मोग करता" असं म्हटलं जातं.

Relationship | Dainik Gomantak

शब्दांचा अर्थ

या वाक्यात 'हांव' म्हणजे 'मी', 'तुजेर' म्हणजे 'तुझ्यावर' आणि 'मोग' म्हणजे 'प्रेम'. 'मोग' हा शब्द गोव्याच्या संस्कृतीत प्रेमाचं प्रतीक मानला जातो.

Relationship | Dainik Gomantak

जोडीदाराला करा सरप्राईज

जर तुम्हाला तुमच्या पार्टनरला काहीतरी वेगळं आणि गोड वाटेल असं म्हणायचं असेल, तर एकदा कोकणी भाषेत प्रेम व्यक्त करुन पाहा. हा अंदाज त्यांना नक्कीच आवडेल.

Relationship | Dainik Gomantak

पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र

गोव्यात फिरायला जाणारे पर्यटक तिथल्या निसर्गासोबतच तिथल्या भाषेच्याही प्रेमात पडतात. 'मोग' हा शब्द तिथे इतका लोकप्रिय आहे की, तो पर्यटकांच्याही ओठावर सहज येतो.

Relationship | Dainik Gomantak

भाषेचा गोडवा अनुभवा

कोकणी ही केवळ भाषा नाही तर ती गोव्याची ओळख आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गोव्याला जाल, तेव्हा "हांव तुजेर मोग करता" हे वाक्य बोलायला विसरु नका!

Relationship | Dainik Gomantak

Chapora Fort: 'दिल चाहता है' फेम किल्ला संभाजी महाराजांनी कसा जिंकला? छत्रपतींची धडकी भरवणारी गोवा मोहीम

आणखी बघा