Sameer Panditrao
दाताच्या वेदनेच्या ठिकाणी कापूर ठेवल्यास आराम मिळेल.
यामध्ये अँटीबॅक्टीरिअल क्वालिटी असते. कांद्याचा तुकडा दात दुखत असलेल्या ठिकाणी ठेवा.
कीड लागल्यामुळे वेदना होत असल्यास पेरूच्या झाडाची ४-५ पाने पाण्यामध्ये उकळून, या पाण्याने गुळणा करा.
तुरटीची पावडर वेदना असलेल्या ठिकाण ठेवा. लाळ बाहेर थुंकत राहा. तुरटीच्या पाण्याने गुळणा केल्यासही आराम मिळेल.
३-४ थेंब मोहरीच्या तेलात चिमुटभर मीठ टाकून दात आणि हिरड्यांची मसाज केल्यास वेदना कमी होतील.
कडूनिंबाच्या काडीने दात घासावेत. कडूनिंबाचे ४-५ पाने चघळल्याने दाताच्या वेदना कमी होतील. कडूनिंबाचे तेल वेदनेच्या ठिकाणी लावल्यास आराम मिळेल.
एक कप कोमट पाण्यामध्ये एक चमचा मीठ टाकून, या पाण्याने थोडावेळ गुळणा करा. दातदुखीचा त्रास कमी होईल.