Constipation Relief: चेहऱ्यावर येईल 'नूर', जर पोट राहील 'क्लिअर'! रात्री झोपण्यापूर्वी करा फक्त 'हे' काम; सकाळी अनुभवाल फ्रेशनेस

Manish Jadhav

पोट साफ न होणे

सकाळी पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असणे ही सध्याची एक मोठी समस्या आहे. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी 'त्रिफळा चूर्ण' किंवा 'भिजवलेले काळे मनुके' खाणे अत्यंत गुणकारी ठरते.

Digestion | Dainik Gomantak

भिजवलेले काळे मनुके

आयुर्वेदानुसार, रात्री झोपण्यापूर्वी 'त्रिफळा चूर्ण' किंवा 'भिजवलेले काळे मनुके' खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुलभ होते. हा एक नैसर्गिक उपाय असून याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Digestion | Dainik Gomantak

पोटासाठी वरदान

रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा त्रिफळा चूर्ण कोमट पाण्यासोबत घेतल्यास पचनसंस्था सक्रिय होते. त्रिफळा हे आवळा, हिरडा आणि बेहेडा यांचे मिश्रण असल्याने ते आतड्यांमधील साचलेली घाण बाहेर काढण्यास मदत करते.

Digestion | Dainik Gomantak

काळे मनुके आणि कोमट पाणी

जर तुम्हाला चूर्ण आवडत नसेल, तर रात्री 5-6 काळे मनुके पाण्यात भिजत घाला आणि झोपण्यापूर्वी ते खाऊन वरून कोमट पाणी प्या. मनुक्यांमधील फायबर बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय ठरते.

Digestion | Dainik Gomantak

गरम दूध आणि तूप

तसेच, अनेकांसाठी रात्री झोपताना एक ग्लास गरम दुधात अर्धा चमचा गायीचे तूप टाकून पिणे खूप फायदेशीर ठरते, ज्यामुळे सकाळी पोट विनासायास साफ होते.

Digestion | Dainik Gomantak

पाणी पिण्याची योग्य पद्धत

रात्री हा उपाय करण्यासोबतच दिवसभरात किमान 3-4 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मल कडक होतो, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो.

Digestion | Dainik Gomantak

हे पथ्य पाळणेही महत्त्वाचे!

रात्रीचे जेवण हलके असावे आणि झोपण्यापूर्वी किमान 2 तास आधी जेवावे. मैद्याचे पदार्थ, जास्त तिखट आणि तेलकट खाणे टाळल्यास या नैसर्गिक उपायांचा रिझल्ट दुप्पट वेगाने मिळतो.

Digestion | Dainik Gomantak

उद्यापासूनच करा सुरुवात!

सकाळचा फ्रेशनेस हवा असेल तर आज रात्रीपासूनच यापैकी एक उपाय करुन पाहा. नैसर्गिकरीत्या पोट साफ झाल्यामुळे तुमची त्वचा सुधारेल आणि दिवसभर शरीरात ऊर्जा टिकून राहील!

Digestion | Dainik Gomantak

Belapur Fort: नवी मुंबईचा 'रॉयल' वारसा अन् चिमाजी अप्पांचा 'तो' ऐतिहासिक विजय... 500 वर्षांचा बेलापूर किल्ल्याचा धगधगता इतिहास

आणखी बघा