Akshata Chhatre
केस ही प्रत्येक स्त्री-पुरुषासाठी अत्यंत जिव्हाळ्याची गोष्ट असते. डोक्यावर घनदाट, काळेभोर, चमकदार केस असावेत असं प्रत्येकालाच वाटतं, मात्र हल्ली लहान वयातच केस गळायला लागतात
यामागे अनेक कारणं असतात चुकीची जीवनशैली, संतुलित आहाराचा अभाव, व्यायाम न करणं, ताज्या फळांचा वापर न करणं, पावसाळ्यात मिळणारं खराब पाणी, आणि केस धुण्यासाठी वापरले जाणारे तीव्र रसायनयुक्त शांपू
पावसाळ्यातील केसांची निगा राखण्याचं रुटीन खूपच उपयुक्त आहे. पावसात केस भिजणार नाहीत याची ती काळजी घ्यायची. जर केस भिजलेच, तर शिकेकाई आणि रीठा यांसारख्या नैसर्गिक घटकांनी केस स्वच्छ धुवून कोरडे करावेत.
आहारातून आवश्यक सर्व पोषक घटक मिळतील याची काळजी घ्यावी. केसांच्या आरोग्यासाठी ती गरज नसताना ड्रायर, ब्लोअर, किंवा स्ट्रेटनर यांसारखी उपकरणं वापरणं टाळावं.
केसांच्या लांबीनुसार रीठा घेऊन त्यात गरम पाणी मिसळून फेसाळ द्रव तयार केला जातो. या रिठ्याच्या पाण्याने केसांना मसाज करून ३-४ मिनिटं ठेवून नंतर केस धुतले जातात, ज्यामुळे केस स्वच्छ आणि मऊ होतात.
कोरफड आणि आवळ्याचा रस मिसळून तयार केलेलं मिश्रण स्प्रे बॉटलमध्ये भरून केसांवर फवारलं जातं. नंतर हलक्या हाताने मसाज करून केस स्वच्छ धुतले जातात.