Akshata Chhatre
बदलत्या वातावरणाचा तणाव, कामात ताण, नात्यात गोंधळ अशा गोष्टी हळूहळू नकारात्मकतेचा वादळ निर्माण करतात.
शारीरिक ताण असेल थकवा, डोकेदुखी, स्नायू दुखणे, निद्रानाश अशा गोष्टी सहन कराव्या लागतात. मानसिक ताण असल्यास एकाग्रता कमी होते , चिडचिड वाढते आणि निर्णय घेता येत नाहीत. माणूस अस्वस्थ होतो.
शारीरिक मोजमाप जसे की रक्तदाब, घाम, हृदय गती किंवा भावनिक मूल्यांकन जसे की चिंता, राग, नैराश्य आणि स्वयं-चाचणीने ताणाची पातळी जाणून घेता येते.
स्वतःला काही प्रश्न विचारा जसं की मी कमी आनंदी वाटतोय का? मला निराशा येतेय का? झोप व्यवस्थित होत नाही का? थकवा सतावतोय का?
“हो” उत्तर असल्यास दीर्घकाळ बाधा निर्माण करेल, त्यामुळे ताबडतोब मनोचिकित्सक किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञ यांचा सल्ला घ्या.
५–१० मिनिटं ध्यान रोज किंवा नियमित व्यायाम योग, संगीत, वाचन, चित्रकला आणि सकारात्मक संवाद तुम्हाला मदत करू शकतात.