Glowing Skin: त्वचेवर हवाय नॅचरल ग्लो? बनवा घरच्या घरी 100% शुद्ध गुलाबजल!

दैनिक गोमन्तक डिजिटल

नैसर्गिक सौंदर्य आणि गुलाबजल

घरगुती गुलाबजल रसायनांपासून मुक्त असते आणि त्वचेला नैसर्गिक ताजेपणा (glow) देते.

Glowing Skin | Dainik Gomantak

लागणारे साहित्य

ताज्या गुलाबाच्या पाकळ्या (२ ते ३ गुलाब), १ ते २ कप पाणी,भांड्यासाठी लहान प्लेट आणि बर्फाचे तुकडे

Glowing Skin | Dainik Gomantak

पाकळ्यांची स्वच्छता

गुलाबाच्या पाकळ्या व्यवस्थित वेगळ्या करून स्वच्छ पाण्याने २-३ वेळा धुवून घ्या. यामुळे पाकळ्यांवरील धूळ आणि माती निघून जाईल.

Glowing Skin | Dainik Gomantak

वाफेची पद्धत

एका मोठ्या भांड्यात मध्ये लहान वाटी किंवा प्लेट उलटी ठेवा. बाजूने गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी टाका. वाटीवर एक खाली खोल असलेले भांडे (bowl) ठेवा.

Glowing Skin | Dainik Gomantak

वाफ साठवण्याची सोपी ट्रिक

मुख्य भांड्यावर उलटे झाकण ठेवा. झाकणावर बर्फाचे तुकडे ठेवा. बर्फामुळे वाफ थंड होऊन मध्यभागी असलेल्या वाटीत शुद्ध गुलाबजल (Rose Water) साठेल.

Glowing Skin | Dainik Gomantak

१० ते १५ मिनिटे उकळू द्या

मंद आचेवर १५ मिनिटे पाणी उकळू द्या. वाटीत साठलेले पाणी हे अत्यंत शुद्ध आणि अर्कयुक्त (distilled) गुलाबजल असेल.

Glowing Skin | Dainik Gomantak

साठवणूक आणि वापर

तयार झालेले गुलाबजल थंड झाल्यावर काचेच्या स्प्रे बॉटलमध्ये भरा. रोज रात्री झोपण्यापूर्वी किंवा टोनर म्हणून त्वचेवर स्प्रे करा!

Glowing Skin | Dainik Gomantak

ऑफिस वेअरसाठी ट्राय करा 'हे' 7 फॉर्मल टी-शर्ट्स

Office Formal T-shirts | Dainik Gomantak
येथे क्लिक करा