Akshata Chhatre
चपाती फक्त पोषणदायी नाही, तर ती जेवणाचा आत्मा असते. ती जर मऊ आणि फुललेली नसेल, तर जेवण अपूर्ण वाटतं. ही कला अवगत करणं म्हणजेच परिपूर्ण स्वयंपाक!
अधिक किंवा कमी पाणी वापरल्यास चपाती कडक होऊ शकते. कोमट पाण्यात थोडंसं मीठ टाकून पीठ मळल्यास, ते एकसंध आणि मऊसर होतं.
अत्याधिक कोरडं पीठ वापरल्यास चपातीचा ओलावा कमी होतो. यामुळे चपाती लवकर कडक होते. लाटताना अगदी थोडं पीठ वापरणं उत्तम.
तवा खूप गरम असेल तर चपाती चिकटते; खूप थंड असेल तर शिजत नाही. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी शिजवल्यास चपाती मस्त फुलते.
पीठ चाळून घ्या, योग्य तापमानावर भाजा, आणि मळताना ओलावा लक्षात ठेवा – हे तीन सोपे नियम पाळलेत, तर तुमच्या चपात्या नक्कीच तोंडात विरघळतील!