Akshata Chhatre
असं म्हणतात भारतात क्रिकेट हा एक धर्म आहे. देशात क्रिकेटचे अनेक चाहते आहे. सध्या तर देशात आयपीएल सुरु आहे त्यामुळे संध्याकाळी ७:३० वाजल्यानंतर आपण टीव्हीसमोर येऊन बसतो.
पण क्रिकेटची खरी मजा घ्यायची असेल तर यासोबत खायला काही तरी मजेदार पदार्थ हवेच नाही का? आज आम्ही तुम्हाला काही असे पदार्थ सुचवणार आहोत, ज्यांच्यासोबत तुम्ही क्रिकेटची मजा लुटू शकाल.
तुम्ही क्रिकेट बघत असताना पॉपकॉर्नची मजा घेऊ शकता. कधीतरी सॉल्टेड किंवा मसालेदार पॉपकॉर्न नक्की ट्राय करा.
क्रिकेट बघताना रोस्टेड चणे खाण्याची सुद्धा मजा वेगळीच असते. यामुळे खेळाची मजा वाढते आणि टाईमपास सुद्धा होतो.
रोस्टेड मखाने खाऊन सुद्धा क्रिकेटचा आनंद घेता येतो. क्रिकेट हा खेळाचं मुळात आनंददायी असल्याने अशा काही पदार्थांमुळे त्याची मजा वाढते.
केळ्याच्या चिप्स बद्दल ऐकून माहितीये ना? केळ्यांचे चिप्स स्नॅक्स म्हणून खूपच छान लागतात. क्रिस्पी आणि सॉल्टेड चिप्समुळे आयपीएलची मजा वाढते.
ड्राय फ्रुटस आणि फळं सुद्धा क्रिकेटसोबत फेव्हरेट पासटाइम असू शकतो. तुम्हाला जर का या खेळाची मजा वाढवायची असेल तर हे टिप्स नक्की फॉलो करा.