Akshata Chhatre
अनेक मुलांना अभ्यास करणे कंटाळवाणे वाटते, त्यामुळे त्यांना अभ्यासाकडे वळवणे पालकांसाठी मोठं आव्हान ठरतं.
मुलांना ओरडण्याऐवजी मैत्रीपूर्ण पद्धतीने अभ्यास घेण्याचा प्रयत्न करा. संवाद साधा आणि हसतखेळत अभ्यास घ्या.
शाळेतून आल्यावर लगेच अभ्यास नको. खेळून झाल्यावर आणि आराम केल्यानंतर अभ्यास घ्या. मध्ये मध्ये गॅप देणे महत्त्वाचे.
मुलांना स्वतःचे काम स्वतः करायला प्रोत्साहित करा. चुकू द्या, मदत करा पण निर्णय स्वतः घेऊ द्या. यामुळे आत्मनिर्भरता वाढते.
मुलं होमवर्क करत असताना त्यामध्ये सतत अडथळा आणू नका. मायक्रोमॅनेजिंग केल्याने मुलांमध्ये राग आणि नैराश्य निर्माण होऊ शकते.