Sameer Amunekar
व्यस्त दिनक्रमातसुद्धा जुने मित्र महत्त्वाचे आहेत हे लक्षात ठेवा. महिन्यातून एकदा का होईना, त्यांना कॉल करा किंवा भेटीचा प्लॅन करा.
मित्र किंवा मैत्रिणीशी संवाद करताना आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक रहा. ओपननेसमुळे गैरसमज टळतात आणि नातेसुद्धा सुरक्षित राहतात.
मित्र-मैत्रिणींसोबत त्यांच्या जोडीदारासहित एखादी गेटटुगेदर ठेवली, तर सगळ्यांनाच कम्फर्ट वाटतो आणि नातेसुद्धा घट्ट होतं.
ग्रुप चॅट, स्टेटस रिप्लाय, लाईक्स याच्या माध्यमातून सातत्य ठेवा. यामुळे आपण दूर असूनही जवळ असल्यासारखं वाटतं.
मित्र संकटात असताना 'मी इथे आहे' एवढं सांगणंही नातं घट्ट करतं. ही छोटी गोष्ट खूप मोठं प्रभाव टाकते.
लग्नानंतर काही सीमारेषा ओळखणे गरजेचे असते. कोणत्याही संवादात किंवा भेटीत आपण आणि आपले मित्र/मैत्रिण दोघंही कंफर्टेबल आहोत का, हे महत्त्वाचं आहे.
आपले मित्र आपल्या जोडीदाराचेही मित्र बनले, तर वादाचं कारणच उरत नाही. त्यामुळे दोघांचेही मैत्रीवर्तुळ एकत्रित करणं फायद्याचं ठरतं.