Sameer Amunekar
ब्रेकअपनंतर दुःख, राग, निराशा या भावना नैसर्गिक आहेत. त्या मनात दडपून न ठेवा. विश्वासू मित्राशी, कुटुंबाशी बोलून त्या व्यक्त करा.
दुखावलेल्या मनाला सावरायला वेळ लागतो. तात्काळ सर्वकाही पूर्ववत होईल, ही अपेक्षा ठेऊ नका.
ब्रेकअपनंतर त्यांचं स्टेटस, फोटो पाहणं हे जखम उघडं ठेवण्यासारखं आहे. सोशल मीडियावरून थोडं दूर राहा.
नवीन मैत्री, नवीन लोक हे तुमचं लक्ष दुसरीकडे वळवू शकतात. सकारात्मक लोकांमध्ये वेळ घालवा.
नातं का तुटलं याचं विश्लेषण करत बसू नका. भविष्याकडे बघा, स्वत:साठी नवीन ध्येय ठरवा.
मन विचलित असताना स्वत:ची काळजी घेणे महत्त्वाचे असते. वर्कआउट करा, छंद जोपासा, आवडती गोष्ट करा.
नवीन गोष्टी शिकण्याचा, प्रवासाचा किंवा नवीन अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. यातून आत्मविश्वास वाढतो.