Manish Jadhav
आधार कार्डचे वैशिष्टय़ म्हणजे त्यात तुमचे फिंगरप्रिंट, आय स्कॅन आणि फेस रेकग्निशन यासारखी माहिती असते. ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर तो त्याचा गैरवापर करु शकतो.
अलीकडेच अशा बातम्या आल्या होत्या की आधार क्रमांकासारखी वैयक्तिक माहिती डार्क वेबवर विकली जात आहे. त्यामुळे तुमची आधार बायोमेट्रिक माहिती सुरक्षित ठेवणे महत्त्वाचे आहे.
आज या बातमीमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही तुमचा आधार बायोमेट्रिक डेटा कसा सुरक्षित ठेवू शकता.
आधार कार्ड जारी करणारी संस्था UIDAI तुम्हाला एक खास सुविधा देते. तुम्ही तुमची बायोमेट्रिक माहिती तुम्हाला पाहिजे तितका काळ लॉक करु शकता. जोपर्यंत तुम्ही ते पुन्हा अनलॉक करत नाही तोपर्यंत कोणीही ते वापरु शकणार नाही.
आधार बायोमेट्रिक्स लॉक करण्याचा सर्वात मोठा फायदा हा आहे की जेव्हा तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक केली जाते, तेव्हा कोणीही तुमचा फिंगरप्रिंट, डोळा स्कॅन किंवा फेस रेकग्निशन डेटा वापरु शकणार नाही.
तथापि, आधार पडताळणीसाठी, तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर OTP पाठवला जाईल जेणेकरुन तुमचे आधार पडताळता येईल.