Akshata Chhatre
हिवाळ्यात त्वचा कोरडी होते आणि याचा परिणाम ओठांवरही होतो. यामुळे ओठ गडद होतात, आत्मविश्वास कमी होतो.
बाजारातील उत्पादनांपेक्षा घरगुती उपाय सुरक्षित आणि परिणामकारक ठरतात. नारळ तेल आणि साखरेचा स्क्रब एक प्रभावी उपाय आहे.
१ चमचा साखर आणि अर्धा चमचा नारळ तेल एकत्र करा. ओठांवर हलक्या हाताने चोळा आणि कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरा.
१ चमचा नारळ तेलात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण रात्रभर ओठांवर लावा आणि सकाळी धुवा. नैसर्गिक ब्लीचचा प्रभाव मिळतो.
१ चमचा साखर, मध आणि नारळ तेल मिसळा. ओठांवर चोळा आणि ५ मिनिटांनी धुवा. आठवड्यातून ३ वेळा वापर करा.
लाब जल ताजेपणा देतो आणि नारळ तेल पोषण. हे दोन्ही एकत्र लावल्यास ओठ मऊ आणि सुंदर दिसतात. दररोज वापरा.