Akshata Chhatre
प्रेमात विश्वास महत्त्वाचा आहे पण काही बदललेली वागणूक ही फसवणुकीचा इशारा देऊ शकते. चला जाणून घेऊया संकेत.
प्रियकर अचानक फोन, सोशल मीडिया, पासवर्ड लपवत असेल तर हे संशयास्पद आहे. खरे प्रेम लपवाछपवी करत नाही.
तो पूर्वीसारखा वेळ देत नाही का? तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत असेल, तर हे त्याच्या बदललेल्या निष्ठेचे लक्षण आहे.
तो एका प्रश्नाला वारंवार वेगवेगळं उत्तर देतोय? बोलण्यात विसंगती असेल तर तो काहीतरी लपवतोय.
लहानसहान गोष्टींवर चिडतोय? तुमच्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करतोय? तर हे नातं संपवण्याची सुरुवात असू शकते.
लग्न किंवा भविष्याबद्दल बोलण्यावर तो विषय बदलतो का? तर त्याचं प्रेम गंभीर नसेल.