Sameer Amunekar
चांगला माणूस तुमचं बोलणं मनापासून ऐकतो. तो मध्येच बोलत नाही, समजून घेतो आणि विचारपूर्वक उत्तर देतो.
जेव्हा अडचण येते, तेव्हा चांगली माणसं मागे हटत नाहीत. मदतीचा हात पुढे करणं ही त्यांची खरी ओळख असते – कुठलाही अपेक्षा न ठेवता.
चुका केल्यावर खोटं बोलून वाचण्याऐवजी चांगला माणूस दिलगिरी व्यक्त करतो. ‘सॉरी’ म्हणायला कचरत नाही.
कुणी गरीब असो किंवा श्रीमंत, महिला असो की पुरुष – चांगली माणसं भेदभाव करत नाहीत. प्रत्येकाशी आदराने आणि नम्रतेने वागतात.
खोटं बोलणं, फसवणूक करणं त्याच्या स्वभावात नसतं. तो जे आहे तेच दाखवतो, बनावटपणा करत नाही.
चांगला माणूस दुसऱ्याच्या यशाचा आदर करतो, आणि त्यात स्वतःचा अपमान समजत नाही. त्याची स्पर्धा फक्त स्वतःशीच असते.