Manish Jadhav
आजकालच्या काळात धावपळीची जीवनशैली, कामाचा ताण अशा गोष्टींमुळे आपले आरोग्य आणि आहाराकडे दुर्लक्ष होतं.
आजच्या या काळात मोठ्याप्रमाणावर जंक फूडचे सेवन केले जात आहे. जंक फूडच्या सेवनामुळे गंभीर आजारांचा धोका वाढतो. मेंदू हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव मानला जातो.
आज (7 जानेवारी) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून बुद्धी तल्लक बनवण्यासाठी दैनंदिन आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे याबाबत जाणून घेणार आहोत.
बदाम, टोमॅटो, कडधान्य आणि हिरव्या पालेभाज्यांमुळे मेंदूचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते.
मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात भरपूर प्रमाणात टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात लायकोपिन नावाचे घटक असते.
मेंदूचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी तुम्ही टोमॅटोबरोबर ड्राय फ्रूट्सचे सेवन केले पाहिजे. ड्राय फ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात हेल्दी फॅट आणि प्रोटिन असतात.
कॉफीमधील कॅफीनमुळे तुमच्या मेंदूमधील विचार करण्याची क्षमता सुधारण्यास मदत होते. परंतु जास्त कॉफीचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
हिरव्या पालेभाज्यांमुळे तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. हिरव्या भाज्यांमध्ये फॉलिकअॅसिड, व्हिटॅमिन के, ल्युटिन आणि बीटा कॅरोटिन भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे तुमच्या मेंदूचे आरोग्य निरोगी राहाते.