Manish Jadhav
नात्यामध्ये 'मी जिंकलो' किंवा 'माझेच कसे बरोबर आहे' ही भावना ईगो वाढवते. कोणत्याही वादात 'माझ्यापेक्षा आमचे नाते अधिक महत्त्वाचे आहे' असा विचार करणे गरजेचे असते.
आपली चूक नसतानाही किंवा वाद मिटवण्यासाठी आधी 'सॉरी' (Chuk Bhul) म्हणणे ही आत्मसन्मानाची हानी नसून ती नात्याप्रती असलेली तुमची प्रगल्भता आणि प्रेम दर्शवते.
रागाच्या भरात ईगो जास्त तीव्र होतो. जोडीदार रागात असताना लगेच उत्तर न देता थोडा वेळ शांत राहिल्यास वाद तिथेच संपतो आणि नंतर शांतपणे बोलून मार्ग काढता येतो.
एखाद्या जुन्या गोष्टीवरुन किंवा जोडीदाराच्या भूतकाळातील चुकीवरुन वारंवार टोमणे मारल्याने ईगो दुखावला जातो. जुन्या चुका विसरुन वर्तमानात जगणे नात्यासाठी फायदेशीर ठरते.
प्रत्येक प्रसंगात फक्त स्वतःच्या बाजूने विचार न करता, जोडीदाराच्या जागी स्वतःला ठेवून विचार करा. यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावना समजणे सोपे जाते आणि ईगो गळून पडतो.
स्वतःचा अनादर सहन न करणे म्हणजे 'स्वाभिमान', तर लहान-सहान गोष्टींवरुन ताठरपणा दाखवणे म्हणजे 'ईगो'. नात्यात क्षुल्लक गोष्टींना ईगोचा मुद्दा बनवणे टाळावे.
जोडीदाराच्या चांगल्या गोष्टींचे उघडपणे कौतुक करा. दिवसातून एकदा तरी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करा; यामुळे ईगो आपोआप गळून पडतो आणि प्रेमाचा गोडवा वाढतो.