असा वाढवा क्रेडिट स्कोअर; लगेच मिळेल कर्ज आणि क्रेडिट कार्ड

Akshay Nirmale

क्रेडिट स्कोअर

क्रेडिट स्कोअरचे महत्त्व खूप वाढले आहे. आता चांगल्या क्रेडिट स्कोअरशिवाय घर किंवा कार घेणे जवळजवळ अशक्य झाले आहे.

Credit Score | Dainik Gomantak

क्रेडिट स्कोअर कसा वाढवायचा

चांगला क्रेडिट स्कोअर मिळविण्यात क्रेडिट कार्ड महत्त्वाची भूमिका बजावते. वेळेवर क्रेडिट कार्ड पेमेंट करत राहिल्यास तुमचा स्कोअरही मजबूत होतो.

Credit Score | Dainik Gomantak

परतफेडीची क्षमता

केवळ चांगल्या क्रेडिट स्कोअरद्वारे, बँका आणि वित्तीय संस्था कर्ज घेण्याची आणि परतफेड करण्याची तुमची क्षमता ठरवू शकतात. तथापि, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड नसले तरीही तुमचा क्रेडिट स्कोर मजबूत होऊ शकतो.

Credit Score | Dainik Gomantak

कर्ज घ्या

बँक किंवा बिगर बँकिंग वित्तीय कंपनीकडून (NBFC) कर्ज घ्या. या कर्जाचे हप्ते वेळेवर भरल्याने तुमचा क्रेडिट स्कोअर मजबूत होतो.

Credit Score | Dainik Gomantak

हफ्ता चुकवू नका

क्रेडिट स्कोअरवर नकारात्मक परिणाम होत असल्याने तुमच्या कर्जाचा हप्ता बाउन्स होणार नाही, याची काळजी घ्या.

Credit Score | Dainik Gomantak

वेळेवर बिले भरा

वीज-पाणी बिल आणि भाडे वेळेवर भरा. याचा तुमच्या आर्थिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. त्याचा परिणाम क्रेडिट स्कोअरवर दिसून येईल.

Credit Score | Dainik Gomantak

नोकरीचे चांगले रेकॉर्ड

जर कर्ज सहज मिळवायचे असेल तर चांगल्या पगाराच्या दीर्घ नोकरीची नोंद ठेवा. कर्ज देणारी बँक किंवा NBFC नोकरीला महत्त्व देते जेणेकरून त्यांचे EMI वेळेवर येतील.

Credit Score | Dainik Gomantak
Janhvi Kapoor | Dainik Gomantak