Akshata Chhatre
अनेकवेळा आपल्याला भाजी विकत घेताना कित्येक प्रश्न सातवातात. काकडीच्या बाबतीत ती काकडी कडू असेल का असा प्रश्न नेहमीच पडतो.
उन्हाळ्यात काकडी गोडसर लागावी असं वाटतं, पण ती कडवट निघाली तर खाण्याचं सगळं निघून समाधान जातं.
उष्णतेत वाढलेली किंवा चुकीच्या साठवणुकीतील काकडी कडवट लागते. योग्य पद्धतीने निवडल्यास हा त्रास टाळता येतो.
ताजी काकडी गडद हिरवी, किंचित खरडवट आणि मऊसर असते. फिकट, पांढरसर किंवा पिवळसर काकडी टाळा.
खूप मोठी काकडी पाणथळी आणि कडवट असते, खूप छोटी काकडी परिपक्व नसते त्यामुळेही कडवट मध्यम आकाराची काकडी निवडा.
जास्त वळण असलेली काकडी टाळा तिच्यात बिया अधिक असतात. हातात घेतल्यावर वजनदार आणि घट्ट वाटणारी काकडी योग्य ठरते.