Sameer Amunekar
अस्सल हापूस (Alphonso) आंबा ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण बाजारात नकली किंवा केमिकलने पिकवलेले आंबेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात. खालील काही सोप्या टिप्सच्या मदतीने तुम्ही खरा हापूस आंबा सहज ओळखू शकता.
हापूस आंबा आतून केशरी रंगाचा असतो, तर कर्नाटकी किंवा इतर आंबे हे आतून पिवळ्या रंगाचे असतात.
अस्सल हापूस आंब्याच्या सुगंध वेगळा असतो. हापूस आंब्याला गोडसर आणि सुगंधी वास असतो, जो नाकाजवळ नेताच जाणवतो.
अस्सल हापूस आंबा वरच्या बाजूला फुगीर असतो, इतर आंबे तुलनेने निमुळते असतात. तो तुलनेत हलकासारखा वाटतो, कारण त्याचा गर फायबर-फ्री आणि मऊसर असतो.
हलकासा दाब दिल्यास तो मऊसर पण घट्ट राहतो. जर आंबा खूपच सैलसर आणि गळक्या टेक्शरचा वाटत असेल, तर तो जास्त कृत्रिमरीत्या पिकवलेला असू शकतो.
बाजारात विविध प्रकारचे आंबे उपलब्ध असताना खरा हापूस कसा ओळखायचा हे ओळखणे महत्त्वाचे आहे.