Sameer Amunekar
पपईप्रमाणेच तिची पानेही आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. पपईची पाने विविध पोषकतत्त्वांनी समृद्ध असून त्याचा उपयोग अनेक आजारांवर केला जातो.
पपईच्या पानांचा रस प्लेटलेट्स वाढवण्यास मदत करतो, त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया झाल्यास तो उपयुक्त ठरतो.
पपईच्या पानांमध्ये असलेले पपेन आणि फायबर्स अन्न पचण्यास मदत करतात आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करतात.
पानांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स शरीरातील इन्सुलिनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करतात, त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.
पपईची पाने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतात आणि फॅटी लिव्हर आणि लिव्हर डॅमेज टाळण्यास मदत करतात.
पपईची पाने अँटीऑक्सिडंट्स रक्तशुद्ध करतात, त्वचेला चमकदार बनवतात आणि मुरुमे कमी करतात.