Monsoon Mosquito Control: घरात डासांचा सुळसुळाट? पावसाळ्यात फक्त 'हे' उपाय करा, डास पुन्हा फिरकणारही नाहीत

Sameer Amunekar

साचलेले पाणी त्वरित काढा

पावसाळ्यात कुंड्या, बादल्या, टायर किंवा कूलरमध्ये साचलेले पाणी हे डासांच्या प्रजननाचे मुख्य ठिकाण असते. आठवड्यातून एकदा तरी ते पूर्णपणे रिकामे करा.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

संध्याकाळी दरवाजे-खिडक्या बंद ठेवा

सूर्यास्तानंतर डासांची हालचाल वाढते. त्यामुळे संध्याकाळी खिडक्या-दरवाजे बंद ठेवा किंवा त्यांना जाळी बसवा.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

नैसर्गिक सुगंधाचा वापर करा

कडुलिंब, लेमनग्रास, सिट्रोनेला किंवा लॅव्हेंडर ऑईलचा सुगंध डासांना दूर ठेवण्यास मदत करतो. डिफ्यूझर किंवा स्प्रेचा वापर करू शकता.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

घराची नियमित स्वच्छता करा

ओलसर कोपरे, बाथरूम, बाल्कनी आणि ड्रेनेज परिसर स्वच्छ ठेवा. कचरा साचू देऊ नका, त्यामुळे डासांची संख्या कमी राहते.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

झोपताना मच्छरदाणी वापरा

विशेषतः लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी मच्छरदाणी हा डासांपासून संरक्षणाचा सर्वात सुरक्षित आणि प्रभावी उपाय आहे.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

डासप्रतिबंधक मशीन किंवा कॉइल वापरा

रात्री झोपण्यापूर्वी लिक्विड वेपोरायझर, इलेक्ट्रिक रॅकेट किंवा डासप्रतिबंधक कॉइलचा योग्य वापर केल्यास डासांचा त्रास कमी होतो.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

अंग झाकणारे कपडे घाला

संध्याकाळी आणि रात्री पूर्ण बाह्यांचे कपडे व पाय झाकणारे वस्त्र परिधान केल्यास डास चावण्याचा धोका कमी होतो.

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak

Glowing skin: चेहऱ्यावर हवा Natural Glow? करा 'हे' काम

Skin Care | Dainik Gomantak
येथे क्लिक करा