Sameer Amunekar
सकाळी आणि रात्री सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे धूळ, तेल आणि घाण दूर होऊन त्वचा ताजी दिसते.
दिवसभरात पुरेसे पाणी पिल्याने त्वचा हायड्रेट राहते. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आणि तजेला दिसून येतो.
त्वचा कोरडी पडू नये म्हणून योग्य मॉइश्चरायझर वापरा. घराबाहेर पडताना SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त सनस्क्रीन लावायला विसरू नका.
व्हिटॅमिन C, E आणि अँटिऑक्सिडंट्सयुक्त आहार त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत करतो आणि नैसर्गिक ग्लो वाढवतो.
रोज 7–8 तासांची शांत झोप त्वचेच्या पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. त्यामुळे चेहरा अधिक फ्रेश आणि उजळ दिसतो.
सौम्य स्क्रब किंवा केमिकल एक्सफोलिएंटने मृत त्वचा काढल्यास चेहरा अधिक स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसतो.
योग, प्राणायाम किंवा हलका व्यायाम केल्याने रक्ताभिसरण सुधारते. यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळण्यास मदत होते.