Akshata Chhatre
एकतर्फी प्रेम आणि त्यानंतर आलेले रिजेक्शन खूप वेदनादायक असू शकते.
स्वतःला या त्रासातून बाहेर काढण्यासाठी आणि मानसिक आरोग्य बिघडू नये म्हणून हे उपाय नक्की करा.
रिजेक्शन नेहमीच त्रासदायक असते. या परिस्थितीतून बाहेर पडण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे तुमच्या भावनांना मोकळी वाट देणे.
तुम्हाला राग येत असो, लाज वाटत असो किंवा रडू येत असो, तुमच्या भावनांना दाबू नका. त्यांना बाहेर येऊ द्या. तुमच्या भावनांना ओळखून त्या स्वीकारणे, हे 'मूव्ह ऑन' करण्याची पहिली पायरी आहे.
जरी तुम्ही अजूनही त्या व्यक्तीवर प्रेम करत असाल, तरी तो/ती तुमचा सोलमेट नाही, हे मान्य करा.
त्या व्यक्तीच्या ज्या सवयी किंवा गुण तुम्हाला आवडत नव्हते, त्यांची आठवण करा. यामुळे तुम्ही पुढे जाऊन अशा व्यक्तीला पार्टनर बनवू शकाल, जो तुमच्यावर खरोखर प्रेम करेल.
एकतर्फी प्रेम असले तरी रिजेक्शननंतर मन तुटतेच. अशावेळी स्वतःला सावरण्यासाठी मित्र-मैत्रिणींपासून काही काळासाठी अंतर ठेवा.