Sameer Amunekar
लाल मसूर डाळ त्वचेवरील मृत पेशी (Dead Skin) काढून टाकण्यासाठी उत्तम नैसर्गिक स्क्रबर म्हणून काम करते. यामुळे त्वचा मऊ आणि नितळ होते.
या डाळीमध्ये असणारे पोषक घटक आणि विटामिन्स त्वचेचा रंग उजळवण्यास मदत करतात. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅनिंग (Tanning) दूर होते.
२ चमचे मसूर डाळ रात्रभर दुधात किंवा पाण्यात भिजत ठेवा. सकाळी त्याची बारीक पेस्ट करून घ्या. हा विनाखर्चिक आणि सोपा उपाय आहे.
डाळीच्या पेस्टमध्ये थोडे कच्चे दूध आणि मध मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर आणि गळ्यावर १५ ते २० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर गार पाण्याने धुवा.
हा उपाय चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल (Excess Oil) नियंत्रित करतो, ज्यामुळे पिंपल्स आणि ब्लॅकहेड्सची समस्या कमी होण्यास मदत होते.
मसूर डाळीतील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करतात, ज्यामुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि घट्ट (Tight) राहते.
केवळ काही दिवसांच्या नियमित वापराने चेहऱ्याला केमिकलशिवाय एक सुंदर, गुलाबी आणि नैसर्गिक चमक (Natural Pinkish Glow) मिळते.