Glowing skin: विना मेकअप सुंदर दिसायचंय? मग फॉलो करा 'या' सोप्या डेली Beauty Tips

Sameer Amunekar

पुरेसे पाणी प्या

दिवसभरात किमान ८-१० ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि त्वचेला आतून नैसर्गिक आर्द्रता मिळून चमक येते.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

रात्रीची ७-८ तासांची शांत झोप घेतल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि त्वचेच्या पेशींचे पुनरुज्जीवन होऊन चेहरा फ्रेश दिसतो.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

सी-टी-एम रूटीन

मेकअप न लावताही सुंदर दिसण्यासाठी रोज 'क्लिंझिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग' करा. यामुळे त्वचेवरील धूळ निघून जाते आणि त्वचा मऊ राहते.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

घरगुती फेस पॅकचा वापर

आठवड्यातून दोनदा बेसन-हळद किंवा कोरफड जेल (Aloe Vera) वापरा. रासायनिक उत्पादनांऐवजी नैसर्गिक गोष्टी त्वचेला अधिक तजेला देतात.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

सनस्क्रीन कधीच विसरू नका

तुम्ही घराबाहेर असा किंवा आत, सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या अतिनील किरणांपासून त्वचेचे रक्षण होते आणि अकाली सुरकुत्या पडत नाहीत.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

चेहऱ्याचा हलका मसाज

रोज रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने किंवा मॉइश्चरायझरने चेहऱ्याचा वरच्या दिशेला मसाज करा. यामुळे रक्ताभिसरण वाढून नैसर्गिक गुलाबी छटा येते.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

आहारावर लक्ष द्या

तुमच्या आहारात हंगामी फळे, हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेव्याचा समावेश करा. व्हिटॅमिन-सी युक्त फळे (जसे संत्री, लिंबू) त्वचेचा ग्लो वाढवण्यास मदत करतात.

Glowing skin tips without makeup | Dainik Gomantak

कोकणातील सर्वात सुंदर 7 बीच

Most Beautiful Beaches in Konkan | Dainik Gomantak
येथे क्लिक करा