Pocket Friendly Goa: कायको टेन्शन लेनेका? बजेट कमी असलं तरी गोवा फिरायची चिंता मिटली...

गोमन्तक डिजिटल टीम

खर्च

गोव्याला जायचं आहे, पण गोवा तर पर्यटनासाठी बराच प्रसिद्ध म्हणजे साहाजिकच तिथे जायचा, राहायचा खर्च भरपूर असेल.

गोवा फिरणं शक्य

असा प्रश्न तुम्हाला देखील पडतो का? हो तर काळजी करू नका, कारण कमी पैश्यात देखील गोवा फिरणं अगदी सहज शक्य आहे.

गैरसमज

बॉलीवूडने दाखवलेल्या चित्रांमुळे गोव्यातलं राहणीमान महाग असेल का असा गैरसमज निर्माण होणं सहाजिक आहे. गोव्यात होणाऱ्या पार्टी आणि एकंदरीत वातावरण याच दिशेला जातं, मात्र हे खरं नाही.

कमीत कमी खर्चात गोवा

कमीत कमी खर्चात गोवा फिरायचा असेल तर मोठमोठाल्या हॉटेल्सची गरज नाही. मडगावमध्ये असलेल्या मंकी मायंड हॉस्टेल सारख्या ठिकाणी जाऊन पटकन फ्रेश होत भटकंतीला सुरुवात करता येते.

रेंटल कार किंवा बाईक

तुम्ही लोकल मोटारसायकलने फिरणार असाल तर हे गणित काहीसं महाग ठरू शकतं मात्र अशावेळी तुम्ही रेंटल कार किंवा बाईकची मदत घेऊ शकता. साधारणपणे एका दिवसासाठी ५०० रुपयांप्रमाणे हे काम होऊन जातं.

जेवण

जेवणाच्या बाबतीत गोव्यात जास्ती विचार करण्याची गरज नसते. इथे अनेक प्रकारची छोटी-मोठी दुकानं आहेत, जिथे बसून मनसोक्त जेवण करता येतं.

कमीत कमी खर्चात प्रवास

गोव्याच्या रस्त्यांवर जर का सहज निघालात तर आजूबाजूला असलेल्या मंदिर, चर्चेस आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवता येतो. समुद्रावर जाण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाही आणि म्हणूनच गोव्यात कमीत कमी खर्चात प्रवास करणं सहज शक्य आहे.

आनंददायी आहे गोव्याची सफर! सोबत घ्या 'हा' अनुभव..

आणखीन बघा