गोमन्तक डिजिटल टीम
गोव्याच्या रस्ते, हिरवळ, समुद्र किनारा आणि शांत वातावरण अनुभवायला चला.
किनाऱ्याजवळ वळण घेणारे रस्ते आणि त्यावरून दिसणारे निळसर समुद्राचे दृश्य मनाला साद घालते.
गोव्यातील खेड्यांमधून जाणारे मातीचे रस्ते ग्रामीण जीवनाचा अनुभव देतात.
रस्त्यावरून दिसणारी पोर्तुगीज कालखंडातील सुंदर घरं आणि चर्च समृद्ध वारशाची आठवण करुन देतात.
डोंगर-दऱ्यांतून जाणारे रस्ते आणि त्यावरील थंडगार वाऱे अदभुत अनुभव देतात.
गोव्याच्या शांत आणि मोकळ्या रस्त्यांवर सायकल सफर करण्याचा आनंद वेगळाच.
सुंदर रस्ते आणि निसर्ग हा रोमँटिक अनुभव आहे.