Akshata Chhatre
लिवरमध्ये गडबड झाल्यास त्याचे परिणाम तुमच्या नखांवर दिसू लागतात. चला जाणून घेऊया 5 महत्त्वाचे संकेत!
लिवर सिरोसिस
नखांचा रंग निस्तेज, पांढरट वा पिवळसर दिसल्यास लिवर सिरोसिसची शक्यता असते. वेळेवर लक्ष दिलं नाही तर हा आजार गंभीर बनू शकतो.
लिवर नीट कार्यरत नसेल तर पोषणशोषण कमी होतं, ज्याचा थेट परिणाम नखांवर होतो. सतत तुटणारी नखं लिवरची कार्यक्षमता घटत असल्याचा संकेत असतो.
जर नखांवर अचानक डाग दिसू लागले, तर ते लिवर इन्फेक्शनमुळे होऊ शकतात. हेपेटायटीसची लक्षणं उशीरा उमटतात, त्यामुळे सतर्कता आवश्यक आहे.
लिवर योग्य प्रकारे बाईल (पित्तरस) निर्माण करत नसेल, तर नखांचा रंग बदलतो. हा एक लक्षणीय इशारा असतो.
जर नखांच्या खाली फुगलेली त्वचा दिसत असेल, तर हे लिवरमध्ये सुरू असलेल्या आजाराचं निदर्शक असू शकतं. डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्या.