How to Control Anger: राग आल्यावर आवाज चढतो? नातेसंबंध टिकवायचे असतील तर आजपासून करा 'हे' काम

Sameer Amunekar

रागात आवाज का चढतो?

रागाच्या भरात भावना अनियंत्रित होतात आणि नकळत आवाज मोठा होतो. यामुळे संवादाऐवजी वाद वाढण्याची शक्यता असते.

How to Control Anger | Dainik Gomantak

बोलण्यापूर्वी 10 सेकंद थांबा

राग आला की लगेच उत्तर देऊ नका. 10 सेकंदांचा छोटा विराम घेतल्याने विचार शांत होतात आणि शब्दांवर नियंत्रण राहते.

How to Control Anger | Dainik Gomantak

शांत आवाजात बोला

मोठ्याने बोलल्याने समोरची व्यक्ती बचावात्मक होते. हळू आणि शांत आवाजात बोलल्यास संवाद अधिक सकारात्मक होतो.

How to Control Anger | Dainik Gomantak

'तू' ऐवजी 'मला' वापरा

"तू नेहमी असं करतोस" म्हणण्याऐवजी "मला यामुळे वाईट वाटलं" असे म्हणा. त्यामुळे आरोप न करता भावना व्यक्त करता येतात.

How to Control Anger | Dainik Gomantak

खोल श्वास घेण्याची सवय लावा

राग वाढत असल्याचे जाणवल्यास 4-5 वेळा खोल श्वास घ्या. यामुळे मन शांत होण्यास मदत होते.

How to Control Anger | Dainik Gomantak

प्रत्येक वाद जिंकणे गरजेचे नाही

काही वेळा नातं जपणं हे वाद जिंकण्यापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं. समजून घेण्याचा प्रयत्न नात्यात विश्वास वाढवतो.

How to Control Anger | Dainik Gomantak

माफी मागण्यास संकोच करू नका

रागात चुकीचे शब्द बोलले असतील तर मनापासून माफी मागा. एक छोटा "सॉरी" नात्यातील दुरावा कमी करून विश्वास पुन्हा निर्माण करू शकतो.

How to Control Anger | Dainik Gomantak

घरात डासांचा सुळसुळाट? पावसाळ्यात फक्त 'हे' उपाय करा

Monsoon Mosquito Control | Dainik Gomantak
येथे क्लिक करा