Akshata Chhatre
उन्हाळ्यात आंब्याशिवाय मजा नाही पण या गोड फळामागे लपलेला असतो एक धोका जोकी वेळीच ओळखला पाहिजे.
आंबा लवकर पिकवण्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाईड, इथिलीन गॅस वापरतात. यामुळे पचन बिघडते, घशाला कोरड पडते किंवा कॅन्सरचा धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो.
तुम्हाला जर घरच्या घरी आंबा तपासायचा असेल तर आंबा पाण्यात टाका. जो आंबा बुडला तो नैसर्गिक आणि जो तरंगला रसायनयुक्त.
नैसर्गिक आंब्याला थोडी हिरवट किनार, नैसर्गिक सुगंध असतो. दुसऱ्या बाजूला रासायनिक आंब्याला एकसंध गडद रंग, कृत्रिम वास असतो.
नैसर्गिक आंबा हा रसाळ, गोडसर चवीचा असतो. रासायनिक आंबा थोडा झणझणीत आणि कोरडसर गर असलेला असतो.
रासायनिक आंबे मुलं, गर्भवती महिलांसाठी घातक असतात यामुळे तोंडाला छाले, गॅस, उलटी यासारख्या तक्रारी निर्माण होऊ शकतात.