गोमन्तक डिजिटल टीम
गाजराचा रस जीवनसत्त्व A, C, आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असतो. हिवाळ्यात त्वचा तजेलदार ठेवण्यास उपयुक्त असतो.
व्हिटॅमिन C ने समृद्ध, हिवाळ्यातील सर्वोत्कृष्ट टॉनिक आवळा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि शरीराला गरम ठेवतो.
व्हिटॅमिन C ने भरलेला संत्र्याचा रस सर्दी व खोकल्यापासून बचाव करतो.
बीटरूटचा रस रक्तशुद्धीसाठी फायदेशीर आणि हिवाळ्यात उष्णता टिकवतो.
आल्याचा रस हिवाळ्यात उबदार ठेवतो, तर लिंबाचा रस शरीर डिटॉक्स करण्यासाठी मदत करतो.
सफरचंदाचा रस हृदयासाठी आरोग्यदायी आणि त्वचेसाठी फायदेशीर, थंडीत पचनासाठी उपयुक्त असतो.
टोमॅटोचा रस अँटीऑक्सिडंट्सने भरलेला असून हिवाळ्यातील त्वचेला आणि आरोग्यास उपयुक्त.