Relationship Tips: स्वभाव विरुद्ध असूनही नातं राहील 'सुपरहिट'; फॉलो करा 'या' 8 टिप्स!

Manish Jadhav

जोडीदाराचा स्वभाव

तुमचा जोडीदार तुमच्यापेक्षा स्वभावाने किंवा आवडीनिवडीने वेगळा असेल, तर सुरुवातीला काही अडचणी येऊ शकतात. मात्र, अशा 'अपोझिट' स्वभावाच्या व्यक्तींमध्येही नातं खूप घट्ट होऊ शकतं.

Relationship Tips | Dainik Gomantak

फरक मान्य करा

तुमचा जोडीदार तुमच्यासारखाच असावा, हा हट्ट सोडा. तो/ती एक वेगळी व्यक्ती आहे आणि त्यांचे विचार वेगळे असू शकतात, हे मनापासून स्वीकारा. बदलाचा प्रयत्न करण्यापेक्षा स्वीकृतीवर भर द्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

संवाद साधा, वाद नको

तुमच्या दोघांच्या पद्धती वेगळ्या असतील, तर एकमेकांशी मोकळेपणाने बोला. एखादी गोष्ट आवडली नाही तर ती शांतपणे सांगा. गैरसमज मनात साठवून ठेवण्यापेक्षा संवादाने प्रश्न सोडवा.

Relationship Tips | Dainik Gomantak

एकमेकांच्या आवडीचा सन्मान करा

जर तुम्हाला शांतता आवडत असेल आणि जोडीदाराला पार्ट्या, तर कधी तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर जा, तर कधी त्यांनी तुमच्यासोबत शांत वेळ घालवावा. एकमेकांच्या आवडीमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा.

Relationship Tips | Dainik Gomantak

तडजोड करायला शिका

नातं टिकवण्यासाठी दोन्ही बाजूंनी थोडी तडजोड करावी लागते. नेहमी 'माझंच खरं' करण्यापेक्षा 'दोघांच्या सुखासाठी काय चांगलं आहे' याचा विचार करुन मधला मार्ग काढा.

Relationship Tips | Dainik Gomantak

गुणांकडे लक्ष द्या

जोडीदार तुमच्यासारखा नाही याचा अर्थ असा नाही की, त्यांच्यात चांगले गुण नाहीत. त्यांच्यातील सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्या. त्यांच्या वेगळेपणामुळे तुमच्या आयुष्यात काय नवीन गोष्टी येतात, याचा आनंद घ्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

स्पेस द्या

दोघांचे स्वभाव वेगळे असल्यामुळे कधीकधी एकमेकांना 'मी-टाइम' देणं गरजेचं असतं. जोडीदाराला त्यांच्या छंदांसाठी किंवा आवडीच्या कामासाठी वेळ दिल्याने नात्यात गुदमरल्यासारखे वाटत नाही.

Relationship Tips | Dainik Gomantak

एकमेकांचे पूरक बना

दोन सारखी माणसं एकमेकांना कंटाळू शकतात, पण दोन वेगळ्या स्वभावाची माणसं एकमेकांची उणीव भरून काढू शकतात. तुमची कमतरता जोडीदाराच्या गुणांनी भरुन निघू शकते, हे लक्षात घ्या.

Relationship Tips | Dainik Gomantak

नेहमी पाठिंबा द्या

स्वभाव कितीही वेगळा असला, तरी कठीण काळात तुम्ही जोडीदाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात, हा विश्वास नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा ठरतो.

Relationship Tips | Dainik Gomantak

Konkan Tourism: कोकणचा स्वर्ग 'दिवेआगर'! निळाशार समुद्र पाहण्यासाठी पर्यटकांची पहिली पसंती

आणखी बघा