Manish Jadhav
नात्यातून बाहेर पडण्यापूर्वी स्वतःच्या मनाची पूर्ण तयारी करा. टॉक्सिक पार्टनर तुम्हाला पुन्हा भावनिक ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करु शकतो, त्यामुळे तुमच्या निर्णयावर ठाम राहा.
जर तुम्हाला पार्टनरच्या रागाची किंवा हिंसक वर्तनाची भीती असेल, तर ब्रेकअपबद्दल सांगण्यासाठी सार्वजनिक (Public) जागा निवडा किंवा फोन/मेसेजद्वारे संवाद साधा.
नाते संपवताना विषयाला फाटे न फोडता थेट आणि स्पष्ट शब्दांत तुमचा निर्णय सांगा. "मला हे नाते पुढे नेायचे नाही," असे सांगून चर्चेला पूर्णविराम द्या.
टॉक्सिक व्यक्ती तुम्हाला आरोपांच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या चिथावणीला बळी पडू नका आणि शांत राहून संभाषण लवकरात लवकर संपवा.
ब्रेकअपनंतर त्यांच्याशी कोणत्याही प्रकारचा संपर्क (फोन, मेसेज, सोशल मीडिया) ठेवू नका. त्यांना सर्व प्लॅटफॉर्मवरून ब्लॉक करा, जेणेकरुन तुम्हाला पुन्हा मानसिक त्रास होणार नाही.
या कठीण काळात तुमच्या जवळच्या, विश्वासू मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना या निर्णयाची कल्पना द्या. त्यांच्या पाठिंब्यामुळे तुम्हाला भावनिक बळ मिळेल.
ब्रेकअपनंतरही जर तो व्यक्ती तुमचा पाठलाग करत असेल किंवा धमकी देत असेल, तर अजिबात घाबरू नका. तात्काळ कायदेशीर किंवा पोलिसांची मदत घ्या.