Akshata Chhatre
आंबा म्हणजे उन्हाळ्याचं सोनं, पण मधुमेह असलेल्या लोकांनी आंबा जरा जपूनच खावा असं म्हटलं जातं. पण तुम्हाला माहितेय का आंबा जर का योग्य प्रकारे खाल्ला तर तो हानिकारक नाही.
आंबा खायचा असेल, तर सकाळी खा. यावेळी शरीराची साखर पचवण्याची क्षमता जास्त असते.
फक्त अर्धा आंबा किंवा लहान वाटीमध्ये चिरलेले तुकडे खाल्ले तरीही पुरेसे असतात. जास्त आंबा खाल्ल्यास रक्तातील साखर वाढू शकते.
आंबा खाताना सोबत फायबरयुक्त पदार्थ जसं की सलाड, भाकरी खाल्ल्याने साखर शोषून घेण्याचा वेग कमी होतो.
आंब्याबरोबर गोड लस्सी, आमरस किंवा साखर टाकून खाणं टाळा.
प्रत्येकाची आरोग्यस्थिती वेगळी असते म्हणून आंबा खाण्यापूर्वी डायबेटिक डायटिशियन किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
मधुमेह असतानाही तुम्ही आंब्याचा आनंद घेऊ शकता पण योग्य वेळ, प्रमाण आणि पद्धत यांचं पालन व्हायला हवं.