Sameer Panditrao
बटाटा हा केवळ पेरू देशात उगम पावलेला स्थानिक कंद होता. जगाला त्याची ओळख नव्हती.
कोलंबसच्या ‘Columbian Exchange’ मुळे बटाटा युरोप, नंतर आफ्रिका आणि आशियात पोहोचला.
पोर्तुगीज आणि डच व्यापाऱ्यांनी बटाट्याची ओळख मलबार किनाऱ्यावर करून दिली. पण खऱ्या अर्थाने बटाट्याचा प्रसार १८व्या शतकात ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने केला.
१९व्या शतकात बंगाल आणि उत्तर भारतात लागवड झाली. कोलकाता स्टाईल बिर्याणीमध्ये मांस कमी पडले तर बटाटा वापरला जाऊ लागला.
यापद्धतीने बटाटा भारतात रुजला आणि खाद्यसंस्कृतीचा भाग बनला.
१९४९-५० मध्ये १.५ दशलक्ष टन बटाट्याचे उत्पादन होते, जे २०१७ पर्यंत ४.८६ कोटी टनांवर पोहोचले.
लोकांनी साठा करताना तांदूळ-डाळबरोबर बटाट्याला अग्रक्रम दिला.