Parenting Tips: तुमचं मूल नैराश्यात तर नाही ना? पालकांनो, 'या' धोक्याच्या घंटांकडे लक्ष द्या

Manish Jadhav

वर्तणुकीतील अचानक बदल

मूल अचानक खूप शांत होणे किंवा पूर्वी आवडणाऱ्या गोष्टींमध्ये रस न घेणे हे नैराश्याचे पहिले लक्षण असू शकते.

parenting tips | Dainik Gomantak

चिडचिड किंवा राग

नैराश्य केवळ उदासपणाच्या रुपात नसते, तर मुले छोट्या छोट्या गोष्टींवरुन चिडचिड करु लागतात किंवा त्यांना सतत राग येतो.

parenting tips- | Dainik Gomantak

झोप न येणे

नेहमीपेक्षा जास्त झोपणे किंवा अजिबात झोप न येणे, तसेच भूक अचानक वाढणे किंवा कमी होणे याकडे लक्ष द्या.

parenting tips- | Dainik Gomantak

स्वतःला खोलीत बंद करणे

मित्र-मैत्रिणींपासून लांब राहणे, घराबाहेर जाणे टाळणे आणि स्वतःला एका खोलीत बंद करुन घेणे हे गंभीर लक्षण आहे.

parenting tips- | Dainik Gomantak

अभ्यासातील कामगिरीवर परिणाम

एकाग्रता कमी झाल्यामुळे मुलांच्या शाळेतील प्रगतीवर किंवा मार्कांवर अचानक वाईट परिणाम दिसून येतो.

parenting tips- | Dainik Gomantak

शारीरिक तक्रारी

कधीकधी मुले डोकेदुखी किंवा पोटदुखीच्या तक्रारी वारंवार करतात, ज्याचे मूळ कारण शारीरिक नसून मानसिक तणाव असू शकते.

parenting tips- | Dainik Gomantak

आत्मविश्वासाची कमतरता

स्वतःबद्दल नकारात्मक बोलणे, "मला काहीच जमणार नाही" किंवा "मी कुचकामी आहे" असे विचार व्यक्त करणे.

parenting tips- | Dainik Gomantak

संवादाचा अभाव

पालकांशी किंवा घरातील व्यक्तींशी बोलणे टाळणे. जर तुमचं मूल मनातलं बोलत नसेल, तर त्यांना विश्वासात घेण्याची गरज आहे.

parenting tips- | Dainik Gomantak

Devgad Fort: त्रिकुटासारखा आकार अन् अथांग समुद्र, कान्होजी आंग्रेंच्या शौर्याची साक्ष देणारा कोकणातील अजेय 'देवगड'

आणखी बघा