Devgad Fort: त्रिकुटासारखा आकार अन् अथांग समुद्र, कान्होजी आंग्रेंच्या शौर्याची साक्ष देणारा कोकणातील अजेय 'देवगड'

Manish Jadhav

आरमाराचे महत्त्वाचे केंद्र

देवगड किल्ला हा मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र होता. 1705 मध्ये कान्होजी आग्रेंनी या किल्ल्याचे महत्त्व ओळखून त्याची डागडुजी केली आणि तो अधिक भक्कम केला.

Devgad Fort | Dainik Gomantak

अवाढव्य तटबंदी

किल्ल्याची तटबंदी आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. या तटबंदीवरुन संपूर्ण देवगड बंदर आणि अथांग अरबी समुद्राचे विहंगम दृश्य दिसते.

Devgad Fort | Dainik Gomantak

भौगोलिक रचना

हा किल्ला तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेला असून एका बाजूला देवगड खाडी आहे. किल्ल्याचा आकार काहीसा त्रिकोणी असून तो एका टेकडीवर वसलेला आहे.

Devgad Fort | Dainik Gomantak

किल्ल्यातील दीपगृह

देवगड किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथले 'लाईट हाऊस'. हे दीपगृह आजही जहाजांना दिशा दाखवण्याचे काम करते आणि पर्यकांसाठी ते मुख्य आकर्षण आहे.

Devgad Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक वास्तू

किल्ल्याच्या आत जुन्या इमारतींचे अवशेष, तोफा आणि पाण्याचे टाके पाहायला मिळतात. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराची रचना आजही थक्क करणारी आहे.

Devgad Fort | Dainik Gomantak

गणेश मंदिर

किल्ल्याच्या परिसरात एक प्राचीन गणेश मंदिर आहे. स्थानिक लोक आणि येणारे पर्यटक या मंदिरात आवर्जून दर्शन घेतात.

Devgad Fort | Dainik Gomantak

सूर्यास्ताचे दृश्य

देवगड किल्ल्याच्या बुरुजावरून दिसणारा सूर्यास्त हा आयुष्यातील अविस्मरणीय अनुभव असतो. आकाश तांबूस रंगाने न्हाऊन निघते तेव्हा किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलते.

Devgad Fort | Dainik Gomantak

पर्यटनाची उत्तम सोय

देवगड शहर हे रेल्वे (कणकवली स्थानक) आणि रस्त्याने जोडलेले आहे. किल्ल्याजवळच सुप्रसिद्ध देवगड बीच आणि खाडी असल्याने येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

Devgad Fort | Dainik Gomantak

Peshwa Bajirao: 41 लढाया अन् एकही पराभव नाही, अवघ्या 48 तासांत गाठली दिल्ली; अटकेपार झेंडा फडकवणारा अपराजित 'बाजीराव'

आणखी बघा