Sameer Amunekar
पावसाळ्यात त्वचेवर तेल आणि घाण साचते. त्यामुळे सकाळी उठल्यावर, संध्याकाळी कामावरून परतल्यावर आणि झोपण्यापूर्वी चेहरा धुणे आवश्यक आहे.
पावसाच्या पाण्यामुळे चेहरा ओलसर राहत असल्यास तो टॉवेलने कोरडा करावा. ओलसरपणा फंगल इन्फेक्शनस कारणीभूत ठरतो.
बाहेरून आल्यावर किंवा चेहरा धुण्यापूर्वी हात धुणं महत्त्वाचं आहे. नाहीतर चेहऱ्यावर बॅक्टेरिया पोहोचू शकतात.
पावसाळ्यात हार्श साबण किंवा स्क्रब टाळावेत. त्वचेला योग्य असा सौम्य फेसवॉश वापरा जो तेल व घाण नीट साफ करेल.
पावसाळ्यात दमट वातावरणामुळे चेहऱ्यावर वारंवार घाम येतो. अशावेळी चेहरा टिश्यूने पुसून शक्य असल्यास थंड पाण्याने धुवा.
गरम पाणी टाळा. ते त्वचेला कोरडे करते. थंड किंवा कोमट पाण्याने चेहरा धुतल्यास ताजेपणा आणि क्लिनिझिंग दोन्ही साध्य होते.
खूप वेळा चेहरा धुतल्यास नैसर्गिक तेल निघून जाऊन त्वचा कोरडी व संवेदनशील होऊ शकते. त्यामुळे 2-3 वेळा पुरेसं आहे.