Akshata Chhatre
उन्हाळ्यात शरीराला अधिक पाण्याची गरज असते. घामामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी पिणे महत्त्वाचे आहे.
सामान्यतः एका दिवसात ८ ते १० ग्लास (२.५ ते ३ लिटर) पाणी प्यावे. उन्हाळ्यात ही मात्रा वाढू शकते.
जास्त कसरत करणाऱ्या आणि बाहेर काम करणाऱ्या लोकांनी दिवसाला ३.५ ते ४ लिटर पाणी प्यावे.
फळांचे रस, ताक, लिंबूपाणी यासारखे द्रव पदार्थ घेतल्याने शरीराला हायड्रेशन मिळते.
पचनावर परिणाम होऊ शकतो.अत्याधिक थंड पाणी पिऊ नका. त्यामुळे घशाला त्रास होऊ शकतो आणि पचनावर परिणाम होऊ शकतो.
तोंड कोरडे पडणे, डोकेदुखी, थकवा ही शरीरात पाणी कमी झाल्याची लक्षणे आहेत. अशी लक्षणे जाणवल्यास लगेच पाणी प्या.
उन्हाळ्यात हायड्रेटेड राहा, वेळच्या वेळी पाणी प्या आणि निरोगी रहा!