Manish Jadhav
उन्हाळ्यात शरीर हायड्रेटेड ठेवणे खूप महत्त्वाचे असते. शरीरात पाण्याची कमतरता झाली तर थकवा, चक्कर येणे, डिहायड्रेशन, उष्णतेचा त्रास आणि त्वचेच्या समस्या होऊ शकतात. म्हणूनच योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचे आहे.
सामान्यतः दिवसाला 3-4 लिटर (8-12 ग्लास) पाणी पिणे गरजेचे असते.
तापमान जास्त असेल किंवा जास्त घाम येत असेल, तर 5 लिटरपर्यंत पाणी पिऊ शकता.
वर्कआउट किंवा जास्त शारीरिक मेहनत करणाऱ्या लोकांनी 4-5 लिटर पाणी प्यावे.
लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींनीही शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसाला किमान 2-3 लिटर पाणी प्यावे.
जास्त थंड पाणी पिऊ नका, ते घशाला आणि पचनसंस्थेला त्रासदायक ठरु शकते.
नियमित आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यास उन्हाळ्यात शरीर फ्रेश आणि एनर्जेटिक राहते .