Sameer Amunekar
छत्रपती शिवाजी महाराजांना किती पत्नी होत्या? त्यांची नावं काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती या वेबस्टोरीतून जाणून घेऊया. सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
सईबाई निंबाळकर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या. त्यांचा जन्म निंबाळकर घराण्यात झाला होता.
सोयराबाई मोहिते या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. छत्रपती राजाराम राजे यांच्या त्या आई होत्या.
पुतळाबाई पालकर या छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्या शिवाजी महाराजांच्या शेवटच्या काळात त्यांच्यासोबत होत्या आणि महाराजांच्या निधनानंतर सती जाण्याचा निर्णय घेतला.
सकवारबाई गायकवाड या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौथ्या पत्नी होत्या.
सगुणाबाई शिर्के या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाचव्या पत्नी होत्या.
काशीबाई जाधव या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सहाव्या पत्नी होत्या. ७ एप्रिल १६५७ रोजी त्यांचा विवाह झाला होता.
लक्ष्मीबाई विचारे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सातव्या पत्नी होत्या.
गुणवंताबाई इंगळे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठव्या पत्नी होत्या.