Walking Benefits: वयानुसार रोज किती पावले चालावे? पाहा हा परफेक्ट चार्ट; वजन झपाट्याने होईल कमी!

Sameer Amunekar

लहान मुले आणि किशोरवयीन (५ ते १८ वर्षे)

या वयोगटात शारीरिक हालचाल जास्त असणे आवश्यक आहे. हाडे आणि स्नायूंच्या मजबुतीसाठी त्यांनी दिवसाला किमान १२,००० ते १५,००० पावले चालणे किंवा खेळणे गरजेचे आहे.

Walking Benefits | Dainik Gomantak

तरुण पिढी (१९ ते ४० वर्षे)

वजन नियंत्रित ठेवण्यासाठी आणि मेटाबॉलिज्म सुधारण्यासाठी तरुणांनी दिवसाला ८,००० ते १०,००० पावले चालण्याचे ध्येय ठेवावे. यामध्ये किमान ३० मिनिटे वेगाने चालण्याचा (Brisk Walking) समावेश असावा.

Walking Benefits | Dainik Gomantak

मध्यमवयीन व्यक्ती (४१ ते ६० वर्षे)

या वयात जीवनशैलीशी संबंधित आजार टाळण्यासाठी दररोज ७,००० ते ९,००० पावले चालणे पुरेसे असते. यामुळे सांधेदुखी आणि हृदयाच्या समस्यांचा धोका कमी होतो.

Walking Benefits | Dainik Gomantak

ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांच्या पुढे)

६० वर्षांनंतर शरीराच्या क्षमतेनुसार ३,००० ते ७,००० पावले चालणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. यामुळे संतुलन टिकून राहते आणि मेंदूचे कार्यही सुधारते.

Walking Benefits | Dainik Gomantak

वजन कमी करण्यासाठी...

फक्त पावले मोजून उपयोग नाही, तर चालण्याचा वेगही महत्त्वाचा आहे. वजन कमी करायचे असेल तर 'ब्रिस्क वॉकिंग' म्हणजेच ताशी ५-६ किमी वेगाने चालल्यास कॅलरीज वेगाने जळतात.

Walking Benefits | Dainik Gomantak

हृदयविकाराचा धोका होतो कमी

नियमित वयानुसार चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित राहतो. दिवसातून केवळ ३० मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते.

Walking Benefits | Dainik Gomantak

सातत्य आणि हायड्रेशन

चालताना नेहमी आरामदायक शूज वापरा आणि शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. आठवड्यातून किमान ५ दिवस हे 'वॉक रुटीन' पाळल्यास वजन कमी करणे अत्यंत सोपे होते.

Walking Benefits | Dainik Gomantak

ग्लोइंग स्किनसाठी शमिता शेट्टीचा 'हा' अतरंगी फंडा

Skin Care Tips | Dainik Gomantak
येथे क्लिक करा