Manish Jadhav
पाणी आपल्या शरीरासाठी खूप गरजेचे आहे.
बरेच लोक सकाळी उठ्ल्यावर एक ग्लास पाणी पितात. सकाळी पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
पण अनेकांना प्रश्न असा पडतो की सकाळी उठल्यानंतर किती ग्लास पाणी प्यावे? एक ग्लास, दोन ग्लास तीन ग्लास की चार ग्लास? चला तर मग या वेबस्टोरीच्या माध्यमातून याविषयी जाणून घेऊया...
सकाळी 4 ते 5 ग्लास पाणी पिणे हे सर्वात चांगले आहे.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी पाणी पिणे ही एक अतिशय प्रभावी आरोग्यदायी सवय मानली जाते.
सकाळी सर्वात आधी पाणी प्यायल्याने यकृत आणि मूत्रपिंडासारखे अवयव सक्रिय होतात.
आपल्या शरीराला दिवसभरात 2 लिटर पाण्याची आवश्यकता असते. तुम्ही सकाळी लिंबू, मध, दालचिनी, ओवा इत्यादी गोष्टी मिक्स करुन डिटॉक्स वॉटर पिऊ शकता.