Sameer Amunekar
एका महिन्यात कोंबडी किती अंडी देऊ शकते हे तिच्या जातीवर, आरोग्यावर आणि सांभाळाच्या पद्धतीवर अवलंबून असते. या वेबस्टोरीमध्ये 6 महत्त्वाचे मुद्दे दिले आहेत.
एक आरोग्यदायी कोंबडी दररोज 1 अंडं घालू शकते, म्हणजेच सरासरी महिन्याला 25 ते 30 अंडी देऊ शकते.
लेगहॉर्न, रॉडक आयलंड रेड, हायब्रिड लेअर्स यासारख्या अंड्याच्या जातींची कोंबडी इतरांपेक्षा जास्त अंडी देते.
कोंबडी 5-6 महिन्यांची झाल्यावर अंडी देणे सुरू करते आणि पहिल्या वर्षात सर्वाधिक अंडी घालते.
पोषणयुक्त आहार दिल्यास कोंबडी नियमित आणि जास्त अंडी घालते. प्रथिनयुक्त आणि खनिजयुक्त आहार अत्यंत आवश्यक आहे.
कोंबडीस 14-16 तास सूर्यप्रकाश किंवा कृत्रिम मिळाल्यास अंडी उत्पादनात वाढ होते.
योग्य लसीकरण, स्वच्छ परिसर आणि आजारांपासून संरक्षण हेही अंडी उत्पादनावर परिणाम करतं.