Sameer Amunekar
कपडे तासन्तास डिटर्जंटच्या पाण्यात ठेवल्याने त्यांचा रंग फिका पडू शकतो. त्यामुळे साधारण १५ ते ३० मिनिटे भिजवणे पुरेसे ठरते. कपड्याच्या प्रकारानुसार वेळ ठरवा.
पांढऱ्या कपड्यांना रंगीत कपड्यांपासून वेगळे धुवा. काही कपड्यांचा रंग पाण्यात उतरून इतर कपड्यांवर डाग पडू शकतात.
जास्त डिटर्जंट वापरल्याने कपडे अधिक स्वच्छ होतातच असे नाही. उलट साबणाचे अवशेष कपड्यांमध्ये राहू शकतात. कपड्यांच्या प्रमाणानुसार डिटर्जंट वापरा.
रेशीम, लोकरीचे आणि नाजूक कपडे धुण्यापूर्वी त्यावरील केअर लेबल वाचा. प्रत्येक कपड्याला एकाच पद्धतीने धुणे योग्य नसते.
कपड्यांवर तेल, चहा किंवा खाद्यपदार्थांचे डाग असतील तर धुण्यापूर्वी त्या भागावर योग्य डाग काढणारे क्लिनर लावा. डाग जोरात घासणे टाळा.
कपडे धुण्यापूर्वी पॅन्टच्या झिप लावा आणि खिशात काही राहिले आहे का ते तपासा. यामुळे इतर कपड्यांचे नुकसान होण्याची शक्यता कमी होते.
धुतलेले कपडे मशीनमध्ये किंवा बादलीत बराच वेळ ठेवू नका. ओलसर कपड्यांमध्ये दुर्गंधी आणि बुरशी वाढू शकते. त्यामुळे कपडे लवकर वाळत घाला.