Sameer Panditrao
दलाई लामा यांची निवड आध्यात्मिक प्रक्रियेद्वारे केली जाते. ही संपूर्ण प्रक्रिया तिबेटी बौद्ध धर्माच्या श्रद्धेवर आधारित असते.
दलाई लामा पुनर्जन्म घेतात, यावर तिबेटी बौद्ध धर्माचा विश्वास आहे. त्यामुळे जेव्हा दलाई लामा यांचे निधन होते, तेव्हा त्यांचा उत्तराधिकारी शोधण्याची प्रक्रियेला सुरुवात होते.
कोणता मुलगा दलाई लामा होईल हे अनेक टप्प्यांत चालणाऱ्या प्रक्रियेनंतर ठरवले जाते.
दलाई लामा यांचा उत्तराधिकारी भविष्यवाणीच्या आधारे शोधला जातो, असे सांगितले जाते.
यासाठी त्यांच्या मृत शरीराची दिशा, त्यांची स्वप्ने, पवित्र सरोवरात दिसणारे विशेष दर्शन आणि चिन्हे या आधारावर दलाई लामा यांच्या उत्तराधिकाऱ्याचा शोध घेण्यात येतो.
दलाई लामा यांचा संभाव्य अवतार शोधल्यानंतर, त्यांना मागील दलाई लामांच्या काही गोष्टी दाखवल्या जातात. जर त्यांनी त्या ओळखल्या तर त्यांना गुरूचा पुनर्जन्म मानले जाते.
दलाई लामांच्या अधिकृत घोषणेनंतर, त्यांना बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान शिकवले जाते, दीक्षा दिली जाते.